आरोग्यम हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम – भंडारा पोलिस

आरोग्यम हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम अभिनव उपक्रम!

मुख्य पृष्ठावर परत जा

आरोग्यम हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम : ओळख

भंडारा पोलीस विभागातील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार व यांचे आरोग्याच्या दृष्टीकोणातून उपायायोजना करण्याकरीता दिनांक 17/04/2025 रोजी भंडारा जिल्हा पोलीस विभागातही नाविण्यपुर्ण प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली.
भंडारा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांची प्रत्येक वर्षी शासन मान्य वैद्यकिय हॉस्पिटलद्वारे संपूर्ण 25 प्रकारे वैद्यकिय तपासणी करण्यात येत असते. सदर तपासणीमध्ये संबंधीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना काही शारीरिक व्याधी आहे किंवा कसे याबाबत वैद्यकिय तपासणीचा रिपोर्ट संबंधीतांना आरोग्यम ॲप मध्ये पाहता येते. सदर रिपोर्टमध्ये संबंधीतांना काही व्याधी असल्यास वैद्यकिय अधिकारी/डॉक्टर यांचेकडून आजारावर उपचार करणेबाबत सुचना, खानपान वर्जित करणेबाबत आणि योग्य व्यायामक करणेबाबत, संबंधीत अधिकारी/अंमलदार यांना देण्यात येत असते आणि सदर ॲपद्वारेअंमलदार यांना माहिती मिळते.
आरोग्यम ॲपमध्ये Medical Reports, Doctor Appointments, Prescriptions, Family Members, Full Body Check up Gr, असे ऑयकॉन उपलब्ध आहे. तसेच कुंटूंबाची काळजी, योग्य आहार, योग, शरीराची काळजी, हृदयाची काळजी याबाबत आर्टीकल दिलेले आहे. तसेच Daily Pranayam Routine, Health Heart, Healthy Diet, रोगी जिवनाचे 27 नियम, आयुष्यभर फिट राहणे, स्वस्थ राहणे याबाबत विवीध व्हिडीओ उपलब्ध करून दिलेले आहे.

आरोग्यम अँप डाउनलोड करा →

आरोग्यम प्रणालीचे पोलीस खात्याला मुख्य फायदे

👉 नियमित आरोग्य तपासणीची सुविधा – पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या शारीरिक स्थितीचे वेळोवेळी परीक्षण होऊन आजारांचे वेळेत निदान होते.
👉 गंभीर आजारांचे लवकर निदान – मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ताणतणाव इत्यादी आजारांची लक्षणे सुरुवातीसच समोर येऊन उपचारास प्रारंभ करता येतो.
👉 कार्यक्षमता वाढ – निरोगी व सक्षम कर्मचारी कार्यक्षेत्रात अधिक जोमाने व कार्यक्षमतेने योगदान देतात.
👉 आपत्कालीन आरोग्य सेवा – आकस्मिक आजारपण किंवा दुखापतीच्या प्रसंगी त्वरित वैद्यकीय साहाय्य मिळते.
👉 मानसिक आरोग्य संवर्धन – समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन व मानसिक स्वास्थ्य कार्यक्रमांच्या माध्यमातून पोलिस दलाचे मानसिक संतुलन मजबूत होते.
👉 अनुपस्थिती कमी होणे – आजारपणामुळे होणाऱ्या रजा कमी होऊन प्रशासनाचे कार्य सातत्याने सुरळीत पार पडते.
👉 कुटुंबीयांसाठी सहाय्यकारी लाभ – काही आरोग्य सेवा व सुविधा पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांनाही उपलब्ध होत असल्याने सामाजिक सुरक्षिततेची भावना दृढ होते.
👉 प्रशासनिक पारदर्शकता व जबाबदारी – आरोग्यविषयक नोंदी प्रणालीबद्ध पद्धतीने उपलब्ध असल्याने व्यवस्थापन सुलभ होते.
👉 नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होणे – निरोगी, सजग व कार्यक्षम पोलीस दलामुळे जनतेचा पोलीस दलावरील विश्वास व सुरक्षा भाव वाढतो.
👉 दीर्घकालीन परिणामकारकता – आरोग्यविषयक योग्य सवयींचा अवलंब केल्यामुळे पोलीस दल दीर्घकाळ तंदुरुस्त व कार्यक्षम राहते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

आरोग्यविषयक योग्य सवयींचा अवलंब केल्यामुळे पोलीस दल दीर्घकाळ तंदुरुस्त व कार्यक्षम राहते.

आमच्याशी संपर्क साधा