👉 भंडारा जिल्हा पोलीस दलाने शिक्षण घेतलेल्या, परंतु सध्या बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे: "दिशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रकल्प केंद्र आणि ई-लायब्ररी योजना." या योजनेचा मुख्य उद्देश भंडारा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू युवा उमेदवारांना विनामूल्य ऑनलाइन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे हा आहे.
👉 सदर उपक्रमातर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी कारणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता "Disha initiative" नावाने You Tube चॅनेल असून सदर चॅनेल वर वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शक Videos Upload करण्यात येत आहेत. तसेच "मी कसा घडलो" या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांचे प्रोत्साहनपर मुलाखतीचे Video सुद्धा सदर चॅनेल वर Upload करण्यात येत आहेत. .
सायबर सुरक्षा प्रेझेंटेशन
व्हिडिओ पहा
भंडारा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : दिशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रकल्प केंद्र आणि ई-लायब्ररी योजना.
आमच्याशी संपर्क साधा