ई-दरबार हा अभिनव प्रयोग भंडारा जिल्ह्यातील पोलिस दलाकरीता पहिल्यांदा आयोजीत करून राबविला आहे. यापुर्वी जिल्हयातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे त्यांच्या तक्रारी व अडचणी टपालव्दारे पाठवित होते. सदर तक्रारी निकाली काढण्याकरीता बराच विलंब होत असे. करीता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कार्यालयीन कामाकरीता वांरवार वेळ काढून नाहत त्रास सहन करावा लागत होता. तसेच काही अधिकारी अंमलदार हे सुट्टीवर असल्यास त्यांना दरबाराचे नियोजीत वेळी हजर राहणे शक्य होत नव्हते. ई-दरबार या अभिनव प्रयोगामुळे जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आतुरतेने भाग घेवून आपल्या शंका व तक्रारी वरीष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून पोलीसांच्या वैयक्तिक कामात होणा-या कार्यालयीन दिरंगाई बाबत माहिती थेट पोलीस अधीक्षक यांना देता येते. प्रामुख्याने मेडीकल बिल,पोलीस वसाहत मधील असूविधा, रखडेली पदोन्नती, वेतननिश्चिती कुटूंबियाची अडचणी असे अनेक मुद्दे निर्भिडपणे पेालीस अधीक्षक यांचे समक्ष मांडले जातात. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे तक्रारीचे वेळोवेळी संबंधीत मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस अधीकारी यांना सुचना देवून निरसन केले व उर्वरीत तक्रारीबाबत वरीष्ठ स्तरावर शीघ्रतेने पाठपूरावा करून लवकरात लवकर निकाली काढण्यात येत आहे.
ई-दरबार प्रेझेंटेशन
व्हिडिओ पहा
ई-दरबारामुळे पोलीस दलाच्या तक्रारींवर जलद, पारदर्शक व प्रभावी पद्धतीने कार्यवाही होऊन त्यांच्या शासकीय व वैयक्तिक अडचणी सोडविल्या जात आहेत.
आमच्याशी संपर्क साधा