अर्ज चौकशीची प्रक्रिया अधिक वेगवान व लोकाभिमुख करणेसाठी एक अभिनव उपक्रम!
मुख्य पृष्ठावर परत जा
सदर उपक्रम हा Service Delivery करीता Whatsapp आधारीत आहे. त्याकरीता भंडारा पोलीस दलाचा अधिकृत Whatsapp नंबर 9834393308 हा नागरीकांना तक्रार अर्ज करण्याकरीता उपलब्ध केलेला आहे.
सदर प्रणालीमुळे नागरिकांना होणारे फायदे 1) घरबसल्या तक्रार नोंदणी, 2) वेळेची बचत, 3) सुलभ संवाद, 4) सुरक्षीतता व गोपणीयता, 5) डिजीटल पुरावे संलग्न करण्याची सोय, 6) तक्रारीचा मागोवा घेण्याची सोय, 7) रात्री/सुट्टीचे दिवषी सुध्दा सेवा, 8) अर्जाची टॅªकींग सुविधा, 9) तक्रारीवर जदल प्रतीसाद, 10) ग्रामिण भागात सुलभ सेवा, 11) पोलीस स्टेषनला भेट न देता सेवा मिळते.
सेवा पोर्टल प्रणालीमध्ये नागरिकांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज प्राप्त होताच पाहिल्या टप्प्यात त्यांची प्रणालीमध्ये नोंदणी केली जाते. तक्रार अर्जाची नोंदणी होताच तक्रारकर्त्याला व्हॉट्सअँपव्दारे पुष्टीकरणाचा संदेष जातो. सदर तक्रार अर्ज संबंधीत पोलीस स्टेशन/उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय/ शाखा यांच्याकडून तक्रार अर्जाच्या चौकशी बाबत वेळोवेळी आवश्यक नोंदी Seva प्रणालीमध्ये घेतल्या जातात.
तक्रार अर्जाच्या चौकशी संदर्भाने प्रत्येक हालचालीची माहिती तक्रारकर्त्याला व्हॉट्सअँप संदेशाद्वारे प्राप्त होत असते. तक्रार अर्जाचा चौकशी किंवा कार्यवाहीचा अहवाल सुध्दा Seva प्रणालीमध्ये अपलोड केला जातो. त्यामुळे चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देखील तात्काळ प्राप्त होतो. सदर प्रणालीव्दारे तक्रारकर्त्याला त्यांच्या तक्रार अर्जासंदर्भाने होणा-या कार्यवाहीबाबत प्रत्येक टप्यावर व्हॉट्सअँपव्दारे माहिती मिळते. तसेच एकदा कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तक्रारकर्त्याला समाधान आहे किंवा नाही, याबाबतही नोंद प्रणालीमध्ये घेतली जाते.े पाठवून जलद तक्रार अर्ज चौकशीची प्रक्रिया अधिक वेगवान व लोकाभिमुख करणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
सेवा प्रेझेंटेशन
व्हिडिओ पहा
.
आमच्याशी संपर्क साधा